नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन…
चंद्रपूर

या कार्यशाळेत भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौर सौ. राखीताई कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते अरुण तीखे, नगरसेवक बंटी चौधरी, नगरसेविका वंदना तीखे, भाजपा माजी नगरसेवक व कार्यकर्ते, मंडळ प्रमुख, युवा मोर्चा पदाधिकारी, महिला मोर्चा कार्यकर्त्या तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यशाळेमध्ये केंद्र सरकारच्या ११ वर्षातील यशस्वी योजनांचा आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, तसेच डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या अभिनव उपक्रमांमुळे देशात झालेला आमूलाग्र बदल उपस्थितांसमोर मांडण्यात आला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरिब, महिला, शेतकरी, युवा यांच्यासाठी क्रांतिकारी योजना राबवून सरकारने त्यांचं जीवनमान उंचावलं आहे. हा आमच्या सरकारचा कार्यसंघटीत आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन आहे.”
कार्यशाळेत कार्यकर्त्यांनीही आपले अनुभव आणि सूचना मांडल्या. उपस्थितांच्या सहभागाने कार्यशाळेला एक विचारमंथनात्मक आणि ऊर्जावान स्वरूप प्राप्त झाले. नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे व उपस्थित नागरिकांचे आभार मानून कार्यशाळेचा समारोप केला. कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी ठरवण्यासाठी भाजप मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.
