Home
Home चंद्रपूर *असेस टू जास्टिस फॉर चिल्ड्रेन व जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन दिल्ली संस्थेची...

*असेस टू जास्टिस फॉर चिल्ड्रेन व जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन दिल्ली संस्थेची टीम चंद्रपुरात.*

0
76

                             चंद्रपूर   

                       हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(वि प्र) :- दिनांक 24/6/25. रोजी रुदय सामाजिक संस्था गडचिरोली व्दारा संचालीत अक्से टु जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रोजेक्ट, चंद्रपूर येथे जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन दिल्लीवरून चंद्रपूर जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचा भाग म्हणून रुदय संस्था अक्सेस टु जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हाभरात मागील तीन वर्षापासून सातत्याने शासनासोबत बालविवाह, बाल लैंगिक शोषण व बाल कामगार या समस्येवर काम करीत आहे त्यांच कामाचा आढावा घेण्यासाठी दिल्लीवरून स्टेट कॉर्डिनेशन टीम मधून मा. जिन्सी जॉन मॅडम, सुचिता दत्ता यांनी भेट दिली रुदय संस्थेचे संचालक  काशिनाथ देवगडे,यांनी स्वागत केले व संस्थेच्या कामकाजाची व जिल्ह्य़ातील बालकांच्या समस्यांबाबत माहिती करून दिली ,त्याच बरोबर दिल्लीवरून आलेल्या प्रतीनीधीनी कामकाजाबाबत आढावा घेतला व चालू वर्षांत प्रकल्पात झालेल्या बदलाबाबत मार्गदर्शन केले,मागील वर्षात काम केलेल्या निवडक गावांना भेटी देऊन संस्थेद्वारे केलेल्या कामाची पाहणी केली व संबंधितांशी चर्चा केली.गावासाठी कोणकोणत्या योजना व कशा पद्धतीने काम केल्या गेले ज्यात बालविवाह, बालकामगार, बाल तस्करी, बाल लैंगिक अत्याचार, त्यावर जनजागरण कार्यक्रम कार्यशाळा, बालग्राम संरक्षण समित्या, अंगणवाडी आशा वर्कर व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा, मालकाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा, बालविवाह मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत बालविवाह मुक्त ग्रामपंचायत त्याचा सर्वे करण्यात आला. मंदिर, मज्जित, चर्च, येथे बालविवाह मुक्त ठिकाण असल्याचे बॅनर पोस्टर लावल्याची चौकशी करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी महाकाली मंदिर परिसरात विजीट करून महाकाली मंदिराचे संस्थापक यांची भेट घेतली आणि चर्चा करून स्पस्ट केले की आमच्या इथे बालविवाह घडून येत नाही. तसेच बालकांसाठी काम करणाऱ्या शासकीय व निमशासकीय सर्व यंत्रांना भेट देण्यात आले त्यात सर्वात प्रथम जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे कार्यालयात बाल संरक्षण कक्ष कार्यालयात भेट देण्यात आली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजित साखरकर व त्यांच्या टीम सोबत सविस्तर चर्चा करून योजनांच्या बाबतीतली माहिती घेण्यात आली. त्यानंतर बालकल्याण समिती चंद्रपूर यांची सरकार नगर बंगाली कॅम्प येथे भेट घेऊन बाल कल्याण समिती समक्ष भेट. घेऊन अध्यक्ष क्षमा बासरकर, बालकल्याण समिती सदस्य वनिता घुमे, समिती सदस्य डॉक्टर जोशना मोहितकर यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यामध्ये बालकल्याण विभाग माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस विभाग बालकल्याण समिती व इतर बालकांची संबंधित विभागाची रुदयसंस्थेच्या अक्सेस टू जस्टीस प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचा कशाप्रकारे समन्वय आहे यावर विशेष माहिती घेण्यात आली. सोबतच प्रभागातील मागील वर्षी घेण्यात आलेले जुनोना गाव या गावाच्या ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील अंगणवाडी आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासोबत समन्वय साधून ग्रामपंचायत मध्ये बैठक घेण्यात आली संस्थेद्वारे ग्रामपंचायत अंतर्गत कोण कोणत्या प्रकारचा लाभ बालकांसाठी देण्यात आला कशा पद्धतीच्या कार्यशाळा चालविण्यात आल्या व तेथे वर्षभरात आढळून आलेल्या बालविवाहाच्या व ह्यूमन ट्राफिक यांच्या केसेस बालकल्याण समिती समक्ष सादर केल्याचे सुद्धा निष्पन्न झाले. आलेल्या टीमला रुदय संस्थेच्या अंतर्गत अक्सेस टू जस्टीस फार चिल्ड्रेन प्रकल्पाचा असलेला समन्वय व कार्य पद्धती यावर समाधानकारक आणि अति उत्कृष्ट असा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. दिल्लीवरून आलेली टीम व रुदय संस्थेचे संचालक देवगडे सर यांचे दिवसभराचे काली मंदिर मंदिर, जुना गाव भेटीचे मार्गदर्शन आयोजन क्षत्रिय अधिकारी शशिकांत मोकाशे यांनी केले. सदर दोऱ्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त रुदय संस्थेचे व्यवस्थापक नरेश मायकलवार, क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाश,.राणी मेश्राम, समुपदेशक, लीगल ऑफीसर अड. अक्षय गेडाम, क्षेत्रीय अधिकारी सोनम लाडे, क्षेत्रीय अधिकारी रश्मी भोयर, हे प्रामुख्याने उपस्थित होते.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                         *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here