Home
Home Breaking News हातात धारदार हत्यार घेउन दहशत माजविणाऱ्या इसमाविरूध्द चंद्रपुर शहर पोलीसांनी केली कार्यवाही.

हातात धारदार हत्यार घेउन दहशत माजविणाऱ्या इसमाविरूध्द चंद्रपुर शहर पोलीसांनी केली कार्यवाही.

0
65

                                चंद्रपुर

                        हॅलो चांदा न्युज

   चंद्रपुर(वि.प्र.): पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे दि.०१/०७/२०२५ रोजी फिर्यादी स.पो.नि. राजेंद्र सोनवणे पो.स्टे. चंद्रपुर शहर सोबत डि.बी. पथकासह पोलिस निरीक्षक सा. याचे आदेशाने पो.स्टे. परिसरात पेट्रोलींग करित असता, मुखबीरद्‌वारे खबर मिळाली की, एक इसम नामे गणपत भुभोने बाबूपेठ पुलीयाचे खाली फुले चौक येथे धारदार हत्यार घेऊन फिरत आहे. अशा खात्रीशीर खबरेवरून रेकार्डवरिल आरोपी नामे सागर उर्फ गणपत शंकर भुजोने, वय ४१ वर्ष, रा. महादेव मंदिर जवळ, बाबुपेठ वार्ड चंदपुर हा हातात धारदार कोयता घेउन येणाऱ्या जाणान्या लोकांना धमकावीत दहशत माजवित असताना मिळुन आल्याने आरोपीची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे कडुन एक धारदार लोखंडी कोयता कापडी मुठ असलेली एकुण लांबी १६.१ इंच कापडी बेल्टची मुठ असलेली किंमत अं. १०० रू. ची मिळून आल्याने पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे गु.र.नं ४४७/२०२५ कलम ४,२५ भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. १)अप.क.:- ४४७/२०२५ कलम ४.२५ भारतीय शस्त्र अधिनियम. २) आरोपीचे नावः सागर उर्फ गणपत शंकर भुजोने, वय ४१ वर्ष, रा. महादेव मंदिर जवळ, बाबुपेठ वार्ड चंद्रपुर २) जप्त माल- एक धारदार लोखंडी कोयता कापडी मुठ असलेली एकुण लांबी १६.१ इंच, लोखंडी पात्याची लांबी १२. ७ इंच, कापडी बेल्टची मुठ ची लांबी ३.४ इंच, पात्याची मध्यभागी २ इंच असलेली किंमत अं. १०० रू..  सदर कार्यवाही पोलीस चंद्रपूर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. निशीकांत रामटेके पो.स्टे. चंद्रपुर शहर, स.पो.नि. राजेंद्र सोनवणे, पो.उप.नि. दत्तात्रय कोलते, पो.उप.नि. विलास निकोडे व त्यांच्या डि.बी. पथकाने केलेली आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here