Home
Home चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची हॉटेल ताडोबा अतिथी इन लोहारा येथे चालवीत असलेल्या कुंटणखान्यावर...

स्थानिक गुन्हे शाखेची हॉटेल ताडोबा अतिथी इन लोहारा येथे चालवीत असलेल्या कुंटणखान्यावर धाड 01 महीलेची सुटका कारवाई.

0
221

HELLO CHANDA NEWS

       चंद्रपूर,(का. प्र.) : स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. रामनगर हददीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, लकी नावाचा मुलगा हॉटेल ताडोबा अतिथी इन लोहारा येथे स्वतचे आर्थिक फायदया करिता पीडित महिला यांना हॉटेल मध्ये बोलावून कुंटणखाना चालवीत आहे. अशी खात्रीशीर माहीतीवरुन हॉटेल ताडोबा अतिथी इन लोहारा येथे छापा टाकला असता आरोपी नामे लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा, वय 26 वर्ष, मॅनेजर,रा. अलवर राजस्थान हा हॉटेल मध्ये एका पीडित महिलेकडून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता वेश्याव्यवसाय करून उपजीविका करत असल्याचे निष्पन झाले या वरून पो.स्टे. रामनगर येथे कलम 3,4,5,7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधि. PITA अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                  सदरची कामगिरी मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात
विशेष पोलीस अधिकारी अमोल काचोरे पोलीस निरीक्षक,पोउपनी संतोष निंभोरकर, पोउपनी सुनील गौरकर, स.फो. धनराज कारकाडे ,पो.हवा.सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे,पोअ प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बादमवार , किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम ,महिला पोलिस छाया निकोडे,अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तीतरे,सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर/AHTU तसेच समाजसेविका सरिता मालू, रेखा भारसकडे ,NGO चंद्रपूर
यांनी केली आहे.

                या द्वारे सर्व लॉजिंग हॉटेल व्यावसायिक यांनी आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे अवैध कुंटणखाणी चालवू नयेत अन्याय कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here