Home चंद्रपूर शिक्षणातील आव्हाने, शिक्षणबंदी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020– कार्यशाळा संपन्न.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर, (का. प्र.) :- रविवार 2 नोव्हेंबर 2025 रोजी ब्राईट इंग्लिश स्कूल ,चोरखिडकी चंद्रपूर येथे शिक्षण बचाव समन्वय समिती चंद्रपूर व लोकसंघ सोशल एज्युकेशन मुव्हमेंट जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या संयुक्त सहकार्यातून शिक्षणातील आव्हाने, शिक्षण बंदी व राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व आपली भूमिका या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख सत्रात मा. रमेश बिजेकर, समन्वयक (शिक्षण बचाव समन्वय समिती महाराष्ट्र) यांनी शिक्षणातील आव्हाने व आपली भूमिका विषद करताना समाजव्यवस्थेतील शिक्षणाचे विविध कंगोरे उलगडून दाखवत शिक्षणाची स्थिती सांगून आजच्या घडीला जातवर्गव्यवस्थेतील मनुधारित विचारसरणीने ग्रसित गुरुकुल शिक्षण व्यवस्थेतील नीती व मूल्ये आजच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात कशी बेमालूमपणे प्रतिबिंबित होतात. हे स्पष्ट करून दाखवले. त्याचबरोबर सुजाण भारतीय नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी यावर यथोचित मार्गदर्शन केले. शाळाबंदीचे प्रश्न आणि शिक्षण धोरण यावर विस्तृत माहिती मा. अपेक्षा अमिन दिवान, प्रतिनिधी ( सचिव मंडळ-शिक्षण बचाव समन्वय समिती विदर्भ) यांनी दिली. शाळेचे व उच्चशिक्षणातील समायोजन ,खाजगीकरण, बाजारीकरण, शिक्षण धोरणातील स्त्रीशिक्षणाविषयीची अनास्था, धोरणाची बाजारीकरण घडवून आणणारी भाषा यातून समाजातील अनुसूचित जाती,जनजाती, इतर प्रवर्ग , स्त्रिया व संपूर्ण शोषित श्रमिक वर्ग शिक्षणातून कसा पद्धतशीर पणे बाहेर फेकल्या जात आहे याची मांडणी केली.
कार्यशाळेचे उद्घाटन ॲड. योगिता रायपूरे, संयोजक लोकसंघ – सोशल एज्युकेशन मुव्हमेंट जिल्हा चंद्रपूर यांनी केले. कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून मा. प्रभाकर गेडाम, समन्वयक (अध्यक्ष मंडळ- शिक्षण बचाव समन्वय समिती विदर्भ) यांनी शिक्षण बचाव समन्वय समितीची संघटनात्मक रचनेची मांडणी, भूमिका व महत्व विषद केले. विविध तालुक्यातील प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. प्रश्नोत्तरे, संवाद, गटचर्चा या माध्यमातून सहभागींच्या प्रश्नांची उकल करण्यात आली. प्रास्ताविक प्रवीण कुमरे यांनी केले. संचालन उमाकांत तिपर्तीवार यांनी तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी हरिदास गौरकर यांनी पार पाडली. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, राजूरा, मूल, चंद्रपूर, राजूरा, कोरपना आदी तालुक्यातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.







*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*