चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी, अनु. जाती मोर्चा महानगर चंद्रपूर च्या वतीने मौलाना आझाद बगीच्या लगत असलेल्या बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्य यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करुन पुष्प मालार्पण करण्यात आले. तसेच माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराजभैय्या अहीर यांच्या हस्ते मालार्पण करण्यात आले. तेव्हा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. राजेंद्र गांधी जिल्हा संघटन मंत्री, जिल्हा महामंत्री श्री. ब्रिजभूषण पाझारे, श्री. सुभाष कासनगट्टुवार जिल्हा महिला अध्यक्ष सौ. अंजलीताई घोटेकर, जिल्हाध्यक्ष अनुसूचीत जाती श्री. धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे, विनोद शेरकी, रूद्र नारायण तिवारी, दिनकर सोमलकर, रवि लोनकर, सचिन कोतपल्लीवार, विट्ठल डुकरे, वंदनाताई जांभुळकर, नुतनताई मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तेव्हा बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानस पुत्र होते. यांनी राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या कार्यकरीत संपूर्ण आयुष्य मागासवर्गीय, शोषीत उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन खर्ची घातले. तसेच हसराज अहीर यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांनी संपूर्ण आयुष्यभर समाज सेवेचे कार्य केले. तेव्हा त्यांच्या ९७ व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या भवनाला पालकमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली तेव्हा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रविण हेमचंद्र खोबरागडे व प्रतीक डोर्लिकर, यांच्या समवेत सामाजिक अनेक विषयावर चर्चा केली.
तेव्हा संजय कंचर्लावार, पुनम तिवारी, सुनिल डोंगरे, राजेश थुल, प्रलय सरकार, सागर भगत, जितेश वाकडे, स्वप्निल मून, मोरेश्वर खैरे, अमोल नगराळे, दिप्तिकेश निरंजने ,अमित निरंजने, रामकुमार आकेपल्लीवार, अनिकेत धरणे, सुनिल महातव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793