आज दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील घुटकाळा वार्ड येथील राजकला मंगल कार्यालयाजवळील एक जिर्ण इमारत कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला चंद्रपूर येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थित आहे. सदर महिलेला आर्थीक मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देवून सदर घटनाक्रमाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर व मनपा आयुक्त चंद्रपूर यांना जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले असून अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये याकरिता चंद्रपूर शहरात अशा किती जिर्ण इमारती आहेत याबाबतची सविस्तर माहिती घेवून उपाययोजना व योग्य कार्यवाही करण्याचे आदेशही पालकमंत्री श्री. सुधीर मुनंटीवार यांनी यावेळी दिले.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793
























