Home चंद्रपूर “चंद्रपूरचा राजा” जटपूरा युवक गणेश मंडळाचा सत्कार व स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न..
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(वि. प्र.) : “चंद्रपूरचा राजा” जटपूरा युवक गणेश मंडळाच्या वतीने पृथ्वी दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभ व स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
जटपुरा युवक व्यायाम शाळा येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुणे म्हणून भागवताचार्य मनीष महाराज यांची उपस्थिती लाभली.
नगरसेवक. रविभाऊ लोणकर व आकाश भाऊ साखरकर यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या कु. थोरवी बेले (९१%) व कु. वंशिका महल्ले (९५%) यांनाही गौरविण्यात आले.
अध्यक्ष दीपक बेले यांनी समाजातील गुणी व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त केला.
मंडळाचे सचिव महेश बेले, कोषाध्यक्ष बाळकृष्ण वैरागडे, उपाध्यक्ष प्रवेश बुटले, उत्सव समितीचे अध्यक्ष कमलेश वैरागडे, अमित बानकर, गणेश खणके, जगदीश आगडे, तुषार लांजेवार, सुरेश वैरागडे, प्रशांत येणुरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शैलेश जुमडे यांनी केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*