HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(वि. प्र.) : ब्रम्हपुरी येतील नामांकित सेवाभावी ख्रिस्तानंद हॉस्पिटल रुग्णालयावर आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई
नामांकित आणि सेवाभावी समजल्या जाणाऱ्या खिस्तानंद रुग्णालयावर आरोग्य प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काही रुग्णांना जंतुसंसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेल्याची गंभीर तक्रार प्राप्त होताच, जिल्हा शल्य चिकित्सकांनी सोमवारी या रुग्णालयाची नोंदणी रद्द करून ऑपरेशन थिएटर आणि नर्सिंग होमशी संबंधित इतर महत्त्वाचे विभाग सील केले.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
खिचन मिशनरीतर्फे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयात अल्पदरात सेवा मिळत असल्याने रुग्णांचा मोठा ओघ असतो.
मात्र, मागील काही दिवसांपूर्वी येथे झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग झाल्याने काही दिवसांतच तब्बल तीन रुग्णांना दृष्टी गमवावी लागल्याच्या तक्रारी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे प्राप्त झाल्या
जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णालयाची नोंदणी पुढील आदेशापर्यंत रद्द केली.
या आरोग्य प्रशासनाने प्रकरणाची तातडीने दखल घेत एक विशेष चौकशी समिती नियुक्त केली.
चौकशी समितीने रुग्णालयाची प्राथमिक पाहणी केली असता, रुग्णालयात आढळलेली प्रचंड अनियमितता आणि ‘बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट, १९४९’ अंतर्गत असलेल्या नियमांचे गंभीर उल्लंघन पाहता, जिल्हा शल्य चिकित्सकांनी या रुग्णालयाची नोंदणी (क्र. १०८) पुढील आदेशापर्यंत तात्काळ रद्द केली आहे.
प्रशासनाने रुग्णालयातील सर्व
शस्त्रक्रियागृहांना टाळे ठोकले असून, अहवाल सादर करण्याचे आदेश ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे प्रशासक फादर शिजो जॉर्ज पनायेलील यांना दिले आहेत.
अवैध शस्त्रक्रियागृह
प्राथमिक अहवालानुसार, हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजूर नसतानाही तिथे अवैधरीत्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात होते.
आरोग्य विभागाने आखून दिलेल्या मानकांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक गठित केले आहे.
प्राथमिक चौकशीत आढळून आलेल्या गंभीर परिस्थितीवरून आणि नियमांच्या उल्लंघनामुळे रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले असून, नोंदणी रद्द करण्यात आली आहे. पूर्ण चौकशी अहवाल येईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील, मात्र बाह्यरुग्ण विभाग सुरू राहाणार आहे.
डॉ. महादेव चिंचोळे,जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर

























