आज दिनांक ०४/११ / २०२२ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सायबर सेल HBचंद्रपुर च्या वतीने मोरवा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या भवनात विधी मार्गदर्शन वव जनजागृती. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश माननिय श्री सुमित जोशी सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरवा ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री भुषण पिदुरकर, प्रमुख पाहुने म्हणुन पडोली पोलीस स्लेशनचे पोलीस निरीक्षक श्री कोंडावार साहेब तसेच मार्गदर्शनात चंद्रपुर जिल्हा सायबर शाखेचे तज्ञ मार्गदर्शक श्री मुजावर अली विशेष मार्गदर्शक म्हणुन श्री शशिकांत मोकाशे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी शासकिय महाविद्यालय मोरवाचे युवा युवती विद्यार्थी वर्ग मोरवा ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटकीय भाषणात मा. न्यायाधिश श्री सुमित जोशी सरांनी वेळेचा उपयोग व पोक्सो कायदा । यावर प्रकाश टाकला, विशेष अतिथी म्हणुन श्री ठाणेदार कोंडावार यांनी वाहहन अधिनियम रोड वरील दुचाकीचा वापर होणारे अपघात यावर प्रतिबंध कसा लावता येईल यावर मार्गदर्शन केले. सायबर शाखेचे मुजावर अली यांनी सायबर अपराधाची माहीती देत त्यापासुन प्रतिबंध कसा छ पालता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले. विशेष मार्गदर्शनात श्री शशिकांत मोकाशे यांनी युवा वर्गाने स्वत:हात कोणत्या प्रकारचे परिवर्तन आणल्यास गुन्हा आणि गुन्हेगारी पासुन कसे अलिप्त राहण्यास मदत होईल यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात उपसरपंच भुषण पिदुरकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे व मान्यवरांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रमात सायबर सेलच्या वतीने प्रकाशित माहीती पुस्तकीचे मान्यवरांच्या हाताने वाटप करण्यात आले. या संपुर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन व प्रास्ताविक सायबर सेलचे कर्मचारी संतोष पानघाटे यांनी केले.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793