आज पासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली असुन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूर मतदारसंघाच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सदर निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
मतदार संघातील प्रश्न सोडवत विकासकामे करण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. शहरी भागासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतुन मतदार संघातील विकासकामांना गती प्राप्त झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदार संघातील विकास कामांसाठी नुकताच २० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून ग्रामिण भागातील रस्तांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान आज पासून नागपूर येथे ११ दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता. चंद्रपूर मतदारसंघातील ग्रामिण भागाच्या मार्गासाठी १० कोटी रुपये देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या दरम्याण सदर मागणी मंजुर करण्यात आली असुन चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागाच्या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सदर निधीतून उसगाव – वढा – धानोरा – पिपरी – मारडा १२ एमडीआर या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ग्रामिण भागातील रस्ते उत्तम करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला आहे. यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असुन यात त्यांना यश प्राप्त होत आहे. केंद्रीय मंत्री यांनी मंजुर केलेल्या 20 कोटी आणि अधिवेशनात मंजुर करण्यात आलेल्या 10 कोटी अशा एकत्रीत 30 कोटी रुपयातुन ग्रामिण भागातील रस्ते चकाकणार असुन याचा मोठा फायदा ग्रामिण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी होणार आहे.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793