* शासकीय कार्यालयात खर्रा खाणा-यांविरुध्द दंडात्मक कारवाईच्या सुचना *

0
52

 

चंद्रपूर, दि. 04 : जिल्ह्याची सीमा ही आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांना लागून असून या भागात गांजाची शेती केली जाते. या प्रदेशातून आणि नागपूर येथूनही अंमली पदार्थाची वाहतूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. अंमली पदार्थाची वाहतूक, विक्री आणि सेवन हा नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी पोलिस विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. तसेच शासकीय कार्यालयात खर्रा खाणा-यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

वीस कलमी सभागृहात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्ह्यात अंमली पदार्थाचा होणारा पुरवठा पूर्णपणे बंद झाला पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी आपल्या गोपनीय माहितीचे स्त्रोत वाढवून वाहतूक, विक्री करणा-यांविरुध्द कडक कारवाई करावी. युवा पिढी हे देशाचे भविष्य आहे. त्यांना व्यसनांपासून दूर ठेवणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. शालेय शिक्षण विभागाने तंबाखुमुक्त शाळा अभियानमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे. शासकीय कार्यालयातही खर्रा खाणा-यांचे प्रमाण निदर्शनास आले आहे. अशा कर्मचा-यांवर विभाग प्रमुखांनी दंडात्मक कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.~~~

=====================

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

=============≠==

, कार्यकारी संपादक गोविंद मित्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here