* दिक्षाभुमीच्या विकासा संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली बैठक *

0
177

 

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या जाणुन घेतल्या सूचना *

===========================

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात चंद्रपूरच्या दिक्षाभुमीचा विकास करण्याची घोषणा केली आहे. त्यांनतर आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी च्या पदाधिका-र्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-र्यांची बैठक घेत त्यांच्या सुचना जाणून घेतल्या.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, उपकार्यकारी अभियंता संजोग मेंढे, डॉ. बाबासाहेब मेमोरिअल सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सहसचिव कुणाल घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश दहेगावकर, उप प्राचार्य संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के यांच्यासह इतर पदाधिका.र्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. प्रत्येक अधिवेशात त्यांनी हा विषय उचलुन धरला आहे. आता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलतांना मुख्यमंत्री यांनीही सदर दिक्षाभुमीच्या विकासाची घोषणा केल्याने येथील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी दिक्षाभुमी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या पदाधिका-र्यांची बैठक घेत येथील विकास कामांबाबत त्यांच्या सूचना जाणुन घेतल्या आहे.
यावेळी ध्यान केंद्र, भिक्कु निवास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सोलर प्लांट, प्रवेशद्वार, परिसर सौदर्यीकरण, संग्रहालय, लायब्ररी, एक हजार लोकांच्या क्षमतेचे सामाजिक सभागृह, लाईंट व्यवस्था, भोजनालय, भव्य बुध्द स्मारक यासह अनेक महत्वांच्या सोयी सुविधांबाबत चर्चा करण्यात आली आहे. याचा आराखडा या अगोदरच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांच्या आश्वासना नंतर लवकरच येथील कामाला सुरवात होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here