श्री कन्यका परमेश्वरी देवस्थान ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने दिनांक ७ आणि ८ जानेवारी २०२३ रोजी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन शकुंतला लॉन चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
====≠===========================
दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वा. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतीक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सपना मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी श्री कन्यका परमश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिलींद कोतपल्लीवार, उपाध्यक्ष संदीप पोशट्टीवार, सचिव राजेश्वर सुरावार, सहसचिव प्रशांत कोलप्याकवार, कोषाध्यक्ष अजय मामीडवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
÷==========================
परिचय मेळाव्याच्या उद्घाटनानंतर परिचय सत्राने मेळाव्याला प्रारंभ होईल. हा मेळावा ७ आणि ८ जानेवारी दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे.
==============================
सौ. सपना सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या मेळाव्यात उपवर-वधूंसह पालकांना प्रवेश निःशुल्क करण्यात आला आहे हे या मेळाव्याचे वैशिष्टय आहे. या मेळाव्याला आर्य वैश्य समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
======================
*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============≠=≠=======≠====
संपादक :- शशी ठक्कर 9881277793