*मुस्लिम समाजाने केला आ.जितेंद्र आव्हाड यांचा निषेध *

0
22

===≠=========================

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाने केली निदर्शने*

========================

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेन्द्र आव्हाड यांनी गुरुवारी टिव्टर हँडल चा वापर करीत सोशल मिडीया च्या माध्यमातुन चंद्रपुर चे सूफ़ी संत हजरत किबला सैय्यद बहेबुतुल्लाह शाह रं. अ.दरगाहचा ‘औरंगज़ेबची क़बर’ असा उल्लेख करीत भाजपा प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ताशेरे ओढले.हा प्रकार मुस्लिम समाजात भ्रम निर्माण करणारा आहे.असे करणे फक्त बावनकुळे यांचा अपमान करणे नसून हा त्या पवित्र दरगाहचाही अपमान आहे.जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो,अश्या घोषणा देत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाने आव्हाड यांच्यावर सायबर कायद्यानुसार कारवाई करा अशी मागणी केली.आव्हाड यांच्या या कृत्यामुळे मुस्लिमसमाज दुखावला आहे.या संदर्भातील निवेदन पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना देण्यात आले आहे.जटपुरा गेट येथे हे आंदोलन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे मार्गदर्शनात भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख जुम्मन रिजवी,महानगर जिल्हाध्यक्ष अमिन शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी,चॉंद पाशा सय्यद,जहीर शेख,सादिक शेख,सलमान खान,प्रमोद धंदरे,सुनिल घोगरे,सुर्यभान चांदेकर,जहीर खान कादरी,अहतेशाम खान,सोहेल शेख,शकील शेख,स्‍वागत सोनुले,सलमान पठाण,आरीफ शेख,सय्यद रुफीक,मौसिन शेख,सैफ शेख,जिब्राईल शेख,मोहम्‍मद इकबाल,बातिम शेख,आयन शेख,सय्यद अजिज,हाजरा बी शेख,हमिदा बानो शेख,फौजिया शेख,फहेमिदा शेख,शबनम सय्यद,रुकय्या शाहा,सायरा शेख,नासरिन अली,रुबीना शेख यांची उपस्थिती होती.
यावेळी अमीन शेख म्हणाले,सूफ़ी संत हजरत किबला सैय्यद बहेबुतुल्लाह शाह रं. अ. चंद्रपुरच्या ही दर्गा गोंडकालीन व सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान आहे. आव्हाडांचे कृत्य म्हसणजे सर्वधर्मियांचा अपमान आहे.आव्हाड हे जवाबदार व्यक्तिमत्व आहे.सोशल मीडियावरील त्यांचे हे कृत्य भाजपाची प्रतिमा धुमीळ करणारी असून समाजमन दिशाभूल करून चेतवणारी आहे.याची गंभीर दखल घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड भा.द.वी. 295 तसेच सायबर कायद्याअंतर्गत आमदार आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======≠====≠==============

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here