_________________;;;
भद्रावती:- आम आदमी पार्टी भद्रावती च्या वतीने शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम जी यांच्या नेतृत्वाखाली तालुका सचिव सुमित हस्तक जी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कोषाध्यक्ष सोनी जी व चंद्रपूर महिला अध्यक्ष पाटील मॅडम जी यांच्या प्रमुख उपस्थिती मधे वाहतुक अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. विषय या प्रमाणे आहे की भद्रावती बसस्थानकावरून जाणारी चंद्रपूर- भद्रावती- माजरी- वणी ही बस बंद पडल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना खुप अडचण होत असते. भद्रावती तालुक्यात कोंढा आणि माजरी या क्षेत्रातील रहिवासी विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात भद्रावती मध्ये शिक्षण घ्यायला येते. भद्रावती ते वणी जाणारे नागरिक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भद्रावती हा एक ऐतिहासिक शहर आहे व भद्रावती शहरात व तालुक्यात एक लाखांच्यावर जनसंख्या आहे व आजूबाजूच्या गावातली नागरिक कुठे जायचं असल्यास भद्रावती बस स्थानक इथेच येतात, तरीही बस स्थानक ला अजून सुद्धा डेपोचा दर्जा मिळालेला नाही. बस स्थानक संबंधित कोणतेही तक्रार किंवा निवेदन देण्यासाठी नागरिकांना वरोरा किंवा चंद्रपूर जावे लागतात नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे खूप गैरसोय होत असल्यामुळे तत्काल चंद्रपूर-भद्रावती-माजरी-वणी या रोडने बस फेरीची सेवा पुन्हा सुरू करण्यात यावे व भद्रावती बस स्थानक ला डेपो चा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावे या करिता निवेदन नेण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष सोनल पाटील, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, तालुका सदस्य सुरज शहा, शहराध्यक्ष प्रफुल्ल भाऊ शेलार, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, सचिन पाटील, मंगेश खंडाळे, केशव पचारे, श्याम पिंपळकर, रितेश नागराळे, राजेश नरवडे, बाळूभाऊ बांदूरकर, प्रदीप लोखंडे, चेतन खोब्रागडे, संजय सातपुते, दोरी स्वामी, घनश्याम गेडाम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
============================
*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==============================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793