* पुढील चार महिन्‍यात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे – ना. मुनगंटीवार *

0
41

=====================

रेल्‍वे बोर्डाच्‍या सदस्‍यांबरोबर केली बाबुपेठ उड्डाणपुलाची पाहणी

 ======================

मागील युती शासनाच्‍या काळात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम मंजूर करून सुरू केले. त्‍यानंतर आलेल्‍या महाविकास आघाडी सरकारने या कामासाठी निधीची तरतूद न केल्‍याने हे काम रखडले. आता पुन्‍हा एकदा युती शासन आल्‍यामुळे पुढील चार महिन्‍यात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे असे निर्देश महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. विभागीय रेल्‍वे वापरकर्ते सल्‍लागार समितीचे सदस्‍य श्री. अजयप्रकाश दुबे यांनी सतत पाठपुरावा केल्‍यामुळे रेल्‍वे विभागाच्‍या पॅसेंजर अॅमिनीटीज सुविधा समितीने चंद्रपूरला भेट दिली. त्‍या समितीतील डॉ. राजेंद्रजी फडके, कैलासजी वर्मा, विभा अवस्‍थीजी, अभिजीतजी दास या सदस्‍यांनी बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍थानक, चंद्रपूर रेल्‍वे स्‍थानक व बाबुपेठ उड्डाणपुलाला भेट दिली. त्‍यानंतर या सर्व सदस्‍यांनी ना. मुनगंटीवार यांच्‍या बरोबर बैठक करून या सर्व ठिकाणच्‍या समस्‍या समजून घेवून त्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी उच्‍च स्‍तरावर प्रयत्‍न करणार असल्‍याचे त्‍यांनी भेटीनंतर सांगीतले.

==========================

गेल्‍या काही वर्षांपासून भारतीय रेल स्‍टेशनवरील प्रवाश्‍यांच्‍या सुविधा व स्‍वच्‍छता या विषयावर गंभीरपणे काम करीत आहे. चंद्रपूर जिल्‍हा हा पर्यटनाच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍वाचा असल्‍याने याठिकाणच्‍या सर्व सुविधा या अद्ययावत असाव्‍या हा ना. मुनगंटीवार यांचा नेहमी प्रयत्‍न राहीला आहे. त्‍याचाच परिणाम म्‍हणून चंद्रपूर व बल्‍लारपूर या दोन्‍ही रेल्‍वे स्‍थानकांना काही वर्षांपूर्वी पारितोषीक मिळाले आहे. यातच विकासाचा एक भाग म्‍हणून बाबुपेठ उड्डाण पुल अतिशय महत्‍वाचा आहे हे ना. मुनगंटीवार यांच्‍या लक्षात आले व हा लवकरात लवकर व्‍हावा यासाठी त्‍यांनी प्रयत्‍न सुरू केले. त्‍या प्रयत्‍नांना यश येवून उड्डाणपुलाचे काम सुरू होवून प्रगतीपथावर चालले होते, परंतु मध्‍ये सरकार बदलले व कामाची गती मंदावली. आता पुन्‍हा एकदा युती शासन आल्‍यावर कामाला गती प्राप्‍त झाली आहे. पुढील दोन महिन्‍यात रेल्‍वे विभागाने आपले काम पूर्ण करावे व त्‍यानंतरच्‍या पुढील दोन महिन्‍यात सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले काम पूर्ण करून उद्घाटनासाठी उड्डाणपुल तयार करावा, असे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===================

याप्रसंगी विभागीय रेल्‍वे वापरकर्ते सल्‍लागार समितीचे सदस्‍य श्री. अजयप्रकाश दुबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. गाडेगोणे, कार्यकारी अभियंता श्री. टांगले, भाजपाचे ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहूल पावडे, जिल्‍हा महासचिव नामदेव डाहूले, महानगर महासचिव ब्रिजभूषण पाझारे, भाजपाचे जिल्‍हा व शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शासकीय अधिकारी तसेच रेल्‍वेचे अधिकारी उपस्थित होते.

=================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here