* बाल वयात क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्राची आवड निर्माण करण्यासाठी शालेय क्रिडा व सांस्कृतीक महोत्सव गरजेचे – आ. किशोर जोरगेवार *

0
56

==================

 * ईनरिच इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.*

======================

विद्यार्थ्यांच्या आयुष्याची पुढील दिशा ही शालेय जिवणातून ठरत असते. त्यामुळे हा काळ त्यांच्यासाठी अतिषय महत्वाचा आहे. शालेय जीवनातील कोवळ्या वयात त्यांच्यावर होणा-या संस्कारातुन ते सुसंस्कृत बनतात. अशात केवळ अभ्यासच नव्हे तर क्रिडा आणि भारतीय संस्कृतीची आवड या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्यासाठी शालेय क्रिडा व सांस्कृतीक महोत्सव अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

ईनरिच इंग्लिश मीडीयम स्कूल तर्फे क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश शंभरकर, प्रफुल निंबाळकर, ईनरीच कॉन्व्हेंटच्या संचालिका, अध्यक्ष वनिता खरतड, तृप्ती निंबाळकर, जिल्हा परिषदचे लेखाधिकारी अजय मेश्राम, अजय रामटेके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, बाबुपेठ सारख्या भागात कॉन्व्हेंट सुरु करुन येथील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह क्रीडा आणि सांस्कृतीक आयोजनमधून ईनरिच स्कुलच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कला गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे मोठे काम केल्या जात आहे. त्यांच्या वतीने दरवर्षी होत असलेले हे आयोजन विद्यार्थ्यांमधील भौतिक व शारिरीक विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

आज इंटरनेट आणि सोशल माध्यमांचे युग आहे. आजचा विद्यार्थी गरजेपेक्षा जास्त या माध्यमांचा वापर करु लागला आहे. परिणामी जमिनी खेळांकडून तो दुरावल्या जात आहे. ही बाब चिंतेची आहे. आता पून्हा त्यांच्यात मातीच्या खेळांची आवड निर्माण करण्यासाठी शाळांनी आणि कॉन्व्हेंट व्यवस्थापनाने पूढाकार घेतला पाहिजे. याची सुरुवात झाली असली तरी ती नियमीत ठेवा असे आवाहण यावेळी बोलतांना त्यांनी केले.

आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही मातीच्या खेळांना प्रोत्साहण मिळावे याकरिता काम करत आहोत. येत्या काळात विविध खेळांचे आयोजन करण्याचा आमचा मानस असुन राज्य पातळीवरचे हे आयोजन असणार आहे. यात ईनरिज कॉन्व्हेंटमधील उत्कृष्ठ खेडाळुंनी सहभाग घ्यावा असे आवाहण यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षवृंदाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here