====================
आम आदमी पार्टी भद्रावती द्वारे दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी रस्त्यांच्या गड्ड्यांवर लहान मुलांच्या हातून डोंगे सोडण्याच एक अनोख उपक्रम राबवीन्यात आले. भद्रावती मध्ये गड्ड्यांची संख्या वाढतच जात आहे, तरीसुद्धा यावर नगरसेवक किंवा नगरपरिषद ला कोणतेही जाग आलेले नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये निवडून दिलेले नगरसेवक यांनी काय केलं हेच प्रश्न निर्माण होतो ? बाहेरून शहर कितीही सुंदर असले तरी वास्तविकता पाहता अंदरून गड्यांचं साम्राज्य उभे झालेले आहे. या गड्यांमुळे भद्रावतीकरांच्या प्रत्येक नागरिकांमधे प्रचंड असा रोष निर्माण झालेला आहे कारन या गड्यांमुळे जीवितहानी सुद्धा झालेली आहे. प्रत्येक वार्डामध्ये डांबरीकरण करून पहिल्याच पावसात ते डांबर कुठे गायब होतो तेच समजत नाही ? भद्रावती नगरपरिषद ला व इथल्या लोकप्रतिनिधींना जाग यावे याकरिता आम आदमी पार्टी भद्रावती ने हा उपक्रम राबविला आहे. यावेळी ड़ोंगा गड्ड्यांमध्ये सोडन्या करिता लहान मुलांमध्ये स्पर्धा ठेवण्यात आले. या वेळी लहान मुलांना गिफ्ट सुद्धा देण्यात आले. या वेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793























