=====≈===============
अम्मा का टिफिन उपक्रमाचे केले कौतूक, मतुआ महासंघाच्या महामेळाव्याचे दिले आमंत्रण
=======================
अखिल भारतीय मतुआ महासंघाच्या देशाच्या प्रमूख संघादिपती तथा पश्चिम बंगालच्या माजी खासदार ममता जी ठाकूर यांनी आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी येत गंगुबाई म्हणजेच अम्मा यांची भेट घेत अम्मा का टिफिन या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, गोविंद मित्रा, पूष्पा देवनाथ यांचीही उपस्थिती होती.
=======================
चंद्रपूर मतदार संघचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात अम्मा का टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत शहरातील अत्यंत गरजू व्यक्तीच्या घरी दररोज जेवणाचा डब्बा पोहोचविल्या जात आहे. यासाठी विशेष टिम तयार करण्यात आली आहे. उपक्रम सुरु झाल्या पासून एकदाही यात खंड पडलेला नाही. नियमीत हे सेवा कार्य सुरु असून या उपक्रमाअंतर्गत गरजुंना मायेचा घास भरविल्या जात आहे.
========================
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांनी टोपल्या विकुन आपल्या परिवराला सक्षम केले आहे. मुलगा आमदार झाल्या नंतर सदर उपक्रम सुरु करण्याबाबत त्यांनी मुलाला सांगितले होते. अम्मा आजही टोपल्या विकुन यासाठी लागणा-या खर्चातही आपला सहभाग देत आहे. या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक केल्या जात असतांना आता पश्चिम बंगालच्या माजी खासदार तथा अखिल भारतीय मतूआ महासंघाच्या च्या प्रमूख संघादिपती ममता ठाकूर यांनीही आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देत अम्माची भेट घेतली. यावेळी त्यांनी सदर उपक्रमाबदल संपुर्ण माहिती जाणून घेतली. सेवा भावनेतून सुरु करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असुन भुकेल्याला भोजन देण्याचे पुण्याचे काम या उपक्रमातुन होत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच त्यांनी यावेळी या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी त्यांनी कुंभमेळा नंतर पश्चीम बंगाल येथे मतुआ महासंघ यांच्या वतीने दरवर्षी आयोजित होणा-या महामेळाव्या करीता येण्याचे जोरगेवार कुटुंबीयांना आमंत्रण दिले. आमदार किशोर जोरगेवार यांनीही आ ँक्टोंबर महिण्यात होत असलेल्या श्री. माता महाकाली महोत्सवाचे निमत्रंण ममता जी ठाकूर यांना दिले आहे.
==============≈====
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793