म्हातारदेवी-शेंनगाव तलावात दुःखद घटना; गणेश विसर्जनादरम्यान युवकाचा बुडून मृत्यू

0
31

====================

चंद्रपूर, 28 सप्टेंबर 2023:   

===================

चंद्रपूर जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. म्हातारदेवी-शेंनगाव तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. सुमित बाळा पोंगळे (वय 20) असे मृतकाचे नाव आहे.

=====================

घुग्घूस येथील साईनगर वार्डातील दत्तात्रय मस्के यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आज महाप्रसादाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील सुमित बाळा पोंगळे हा त्यांचा भाचा आला होता.

====================

आज विसर्जन करण्यासाठी संपूर्ण परिवार व नातेवाईक म्हातारदेवी-शेंनगाव रस्त्यावरील तलावात गेले होते. गणरायाची विधिवत पूजा, आरती करून तलावात विसर्जन करण्यासाठी सर्व उतरलेत. विसर्जन झाल्यावर सुमितने डुबकी मारली. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही.

=========================

तलावात जेसीबीने खोल खड्डे खोदले गेले होते. या खड्यात सुमित फसला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला.

===========≈==========

घटनेची माहिती घुग्घूस पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here