शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे ग्रंथालय इमारतीच्‍या बांधकामासाठी ३ कोटी रू. निधी वितरीत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे यश.

0
60

शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे ग्रंथालय इमारतीच्‍या बांधकामासाठी ३ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. राज्‍य शासनाच्‍या उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाने यासंदर्भात दिनांक १५ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सततच्‍या पाठपुराव्‍याला व प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.

 

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूरच्‍या स्‍थापनेपासून या महाविद्यालयात आवश्‍यक सोयीसुविधा उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने सातत्‍याने प्रयत्‍न केले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सदर अभियांत्रीकी महाविद्यालयात अनुसुचित जाती तसेच जमाती प्रवर्गातील विद्यार्थीनींसाठी वसतीगृह इमारत बांधकामासाठी दिनांक १० फेब्रुवारी २०२२ च्‍या उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाच्‍या शासन निर्णयान्‍वये ७ कोटी ८९ लक्ष ६० हजार रू. किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. सदर अभियांत्रीकी महाविद्यालयात ग्रंथालय इमारतीअभावी विद्यार्थ्‍यांना मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. त्‍याचा विपरीत परिणाम अभियांत्रीकी शिक्षणावर होत असल्‍याने याठिकाणी ग्रंथालयाची सुसज्‍ज इमारत उपलब्‍ध व्‍हावी यासाठी आ. मुनगंटीवार यांनी शासनाशी सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा करत विधानसभेत तारांकित प्रश्‍न, कपात सुचना या संसदीय आयुधांचा वापर करून हा विषय रेटुन धरला. त्‍यांच्‍या सततच्‍या प्रयत्‍नांच्‍या फलस्‍वरूप शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे ग्रंथालय इमारत बांधकामासाठी ३ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे.

संपादक शशि ठक्कर

उप संपादक प्रदीप कुमार तपासे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here