शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात; लोकसभा सभापतीला देणार पत्र

0
55

मुंबई : आमदारांच्या बंडानंतर (Revolt) दरदिवशी शिवसेनेला विविध प्रकारे खिंडार पडत असल्याचे बघायला मिळाले. आमदार, पक्षनेते, नगरसेवक व आता शिवसेनेच्या जवळपास १२ खासदारांनी उद्धव ठाकरेविरोधात दंड थोपटले आहे. आज राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह हे १२ खासदार लोकसभा सभापती (Loksabha Speaker) ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना पत्र देणार आहे. भेटीदरम्यान हे खासदार आमचा गट म्हणजेच शिवसेना आहे अशी मागणी करणार आहे. यावेळी सर्व खासदार पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेणार आहे.
संसदेतील एकूण १४ खासदार आमच्यासोबत असल्याचे मत हे खासदार लोकसभा सभापतीपुढे मांडणार आहे. खासदारांचा गट, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आमदारांच्या अपात्रतेबाबत चर्चेकरिता, महाधिवक्ता (Advocate General) मुकूल रोहतगी व केंद्रीय गृहमंत्री (Central Home Minister) अमित शाह यांची देखील भेट याप्रसंगी घेतील. एकंदरीतच राज्यस्तरावर सुरु झालेली शिवसेनेची पडझड आता राष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे. एकूण १२ खासदारांची स्वाक्षरी असलेले पत्र लोकसभा सभापतींना दिल्यानंतर अधिकृत शिवसेना गट म्हणून आम्हाला मान्यता मिळेल, असा विश्वास या सर्व खासदारांनी व्यक्त केला आहे. या पत्रात खासदार भावना गवळी यांना लोकसभा प्रतोद म्हणून देखील खासदारांनी पाठिंबा दर्शविला आहे.
सध्याची स्थिती बघता येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या संकटात मोठी वाढ होणार हे नक्की, कारण राज्याचे पक्षनाट्य दिल्लीत पोहोचणार असून आता लोकसभा सभापती यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

संपादक शशि ठक्कर

उप संपादक प्रदीप कुमार तपासे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here