======================
17 डिसेंबर ला रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध समाजांच्या 101 धार्मिक स्थळी प्रार्थना करण्यात येणार आहे. तर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेड व शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धार्मिक सामाजिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी शहरातील 101 विविध धार्मिक स्थळी प्रार्थना केल्या जाणार आहे. तर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या जाणार आहे. दुपारी 12 वाजता कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कर्तव्य सेतुच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले विविध योजनांचे प्रमाणपत्र व धनादेश वितरण केल्या जाणार आहे. बस स्थानक येथे ही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येथील कार्यक्रमात आटो चालकांचा सत्कार केल्या जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता महाकाली काॅलरी येथे यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर महानगरपालिकेच्या पटांगणावर गरजु विद्यार्थीनींना सायकल वाटप केल्या जाणार आहे. याच कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनाही तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. यासह दिवसभरच विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.
====================≠====
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069