*माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिति की ओर से समिति पदाधिकारी को मरणोपरांत आर्थिक मदद।*

0
27

=======================

*चंद्रपूर*

=====================

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने मा. महेश सारनिकर महाराष्ट्र अध्यक्ष याच्या मार्गदर्शनात आज स्व. श्री किशोर थेरकर यांचे घरी भेट देण्यात आली. त्यांचे 15 दिवसापूर्वी अपघाती निधन झाले, त्यांच्या पच्छात्य लहान लहान दोन मुले, पत्नी व वयोवृद्ध आई आहे. स्वर्गीय किशोर थेरकर हे एका खाजगी शैक्षणिक संस्थेत शिक्षक पदावर कार्यरत होते. सदर संस्थेला अजूनही अनुदान प्राप्त नाही. त्यामुळे ते तिथे विनामोबदला काम करीत होते. त्यामुळं या परिवारावर मानसिक व आर्थिक संकट आहेच यात तिळमात्र शंका नाहीच….. स्व. किशोर थेरकर हे आपल्या संघटनेतील एक पदाधिकारी होते. आज  त्यांच्या असाह्य परिवाराला महाराष्ट्रातील आपल्या सर्वांकडून 35567/- (पस्तीस हजार पाचशे सदूसट रुपये ) आर्थिक मदत प्राप्त झालेली होती. प्राप्त आर्थिक मदत त्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आली.  मा. मनोज उराडे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष यांच्या परिश्रमाणे  आपल्या सर्वांच्या वतीने ती आर्थिक मदत त्यांच्या सुपूर्त करतांना मनाला कुठेतरी आनंद झाला. कि आपण त्या कुटुंबाला थोडी मदत करू करुण मानसिक व आर्थिक समाधान देण्याचा थोडा प्रयत्न करू शकलो. आपली समिति फक्त समिति नसून एक कुटुंब आहे हे आपण  सर्वांनी दाखवून दिले.
या प्रसंगी छोटीशी शोक सभा घेण्यात आली. नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष जयपाल कातकर यांनी शोकसभेचे प्रास्ताविक केले तर गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मा. मनोज उराडे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. तसेच सभेला स्थानिक पत्रकार सुद्धा उपस्तिथ होते.  अतुल भडके यांनी शोक सभेचे  आभार व्यक्त केले.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here