*लोकशिक्षण संस्थेच्या परिसरात वाचक महोत्सवाचे आयोजन*

0
34

========================

    *वरोरा*

=========================

 *एक नावीन्यपूर्ण उपक्रम
वरोरा दिनांक 14 फेब्रुवारी*
लोकशिक्षण संस्था वरोडा संचालित लोकमान्य इंग्रजी विद्यालयाच्या वतीने ‘असे वाचक घडलो आम्ही’ या उपक्रमाचे आयोजन लोकमान्य प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात 18 फेब्रुवारी, रविवारला करण्यात आले आहे
‘ येणे वाचने तोषावे ‘ या पहिल्या सत्रात नागपूर येथील प्रवीण योगी, डॉ संजय भक्ते, हिंगणघाट येथील डॉ. चंद्रकांत नगराळे, हे वाचक त्यांच्या वैयक्तिक ग्रंथ संग्रहाबद्दल विचार व्यक्त करतील. तत्पूर्वी लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील हे बीज प्रास्ताविक करतील
‘ वाचू आनंदे ‘ या दुसऱ्या सत्रात प्रा सचिन सावरकर, वर्धा, विजय देशपांडे, यवतमाळ, वैशाली जानवे, शंकर दिगदेवतुलवार आणि दीपक नवले हे वाचक ‘मला आवडलेली पुस्तके आणि विविध उपक्रम’ यावर आपला अभिप्राय व्यक्त करतील.
‘लेखक वाचकाच्या भेटीला’ या तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध नाट्य लेखक प्रमोद भुसारी, नागपूर आणि प्रसिद्ध साहित्यिक प्रा डॉ प्रमोद नारायणे, वर्धा या पुरस्कार प्राप्त लेखकांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे.
अखेरच्या सत्रात विविध ठिकाणी होत असलेल्या प्रचलित विविध उपक्रमांचा परिचय मुक्त चर्चेतून रसिकांना होणार आहे.
वाचक श्रोता आणि वाचक वक्ता असे या उपक्रमाचे स्वरूप असून असे घडलो आम्ही या उपक्रमाचे हे सातवे पुष्प आहे. आपल्या सभोवतालच्या वाचकांच्या समृद्ध अनुभवाचे दर्शन होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे
महोत्सवाचे नाममात्र शुल्क पन्नास रुपये असून जिज्ञासू वाचकांना या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here