*बल्लरपुरात अल्पवयीन मुली वर बलात्कार प्रकरणी आरोपिस 20 वर्ष सश्रम कारावास।*

0
43

=========================

*अप क. १३७४/२०१८ कलम ३७६ (२) (१), ३६३ (अ) भादवी सहकलम ४ पोक्सो गुन्हयातील आरोपीस २० वर्ष शिक्षेबाबत*

===========================

     *बल्लारशाह*

============================

दिनांक १७/१२/२०१८ रोजी पोलीस स्टेशन पोस्टे बल्लारशाह हद्दीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीवर आरोपीने वारंवार जबरीने लैंगीक अत्याचार केला होता. त्यामुळे ३५ वर्षीय आरोपी विरुध्द दिनांक १७/१२/२०१८ रोजी पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे अपराध क्रमांक १३७४/२०१८ कलम ३७६ (२) (१), ३६३ (अ) भादवी सहकलम ४ लैंगीक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोउपनी प्राची राजुरकर यांनी केला असुन आरोपी विरूध्द सबळ साक्षपुरावा उपल्बध करूण गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी विरूध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सदर खटला मा. कोर्ट विद्यमान अनुराग दिक्षीत साहेब सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी विरूध्द खटला चालु असतांना सबळ साक्षपुरावे मिळुन आल्याने आज दिनांक ०६/०३/२०२४ रोजी आरोपी चिन्ना उर्फ रामलाल निषाद वय ३५ वर्ष यास २० वर्ष सश्रम कारावास व ५००० रू. दंड, दंड न भरल्यास १२ महीने कारावास अशी शिक्षा देण्यातआले,

========================

सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता आसिफ शेख तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन महिला पोहवा. अनिता मोहुर्ले ब.न.२६८ पोस्टे बल्लारशाह यांनी मोलाची कामगीरी बजावली.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here