==========================
*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची मौजा वडगाव हद्दित रेती तस्करा विरूध्द कारवाई 03 ट्रॅक्टरसहीत 06,03,500/-रू चा मुददेमाल जप्त*
=========================
चंद्रपुर जिल्हयातील अवैध रीत्या होत असलेल्या रेती / वाळु तस्कारांवर आळा घालण्या करिता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून मौजा वडगाव हद्दितून रेती / वाळु अवैदयरीत्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना रेती/वाळु तस्कांविरूध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे विशेष पथकाने दि. 06/03/2024 रोजी मिळालेल्या गोपणिय माहीती वरून मौजा वडगाव हद्दितील ईरई नदी पात्रात सापळा रचुन तिथे एक ट्रक्टर क्र एम एच 34 एल 5325 हा रेती भरून जात असताना व ईरइ नदी पात्रात दोन टॅक्टर चोरीची रेती भरताना दिसले असता जाणारे टॅक्टरला हात दाखवुन थांबविले असता तो ट्रक्टर तिथे थांबला व नदीपात्रात रेती चोरीचा प्रयत्न करीत असलेले दोन टॅक्टर पळण्याचा प्रयत्न करीत असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. गौन खनिज रेतीची संगणमताने चोरी व चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी 1) शुभम संभा गोवर्धन वय 29 वर्ष रा. अपेक्षा नगर वडगाव, चंद्रपुर 2) बालाजी महदेव जुमनाके वय 38 वर्षे रा.हनुमान मंदिर जवळ कोसारा चंद्रपूर 3) रमेश नामदेव बदखल वय 50 वर्षे रा. गुरूदेव नगर, कोसारा पडोली, चंद्रपूर 4) परमीदर सिंग कतार सिंग वय 55 वर्षे रा. भावना सोसायटी वडगाव चंद्रपूर यांचे कडून एकूण 6.03,500/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपीतां विरुध्द पो.स्टे. रामनगर येथे अप. क. 249/2024 कलम 379,511,34 भा.द.वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
==========================
सदर कामगिरी मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा.. मा.अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू में.यांचे मार्गदर्शना खाली महेश कोंडावार, पोनी स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोनि किशोर शेरकी, पोउपनि विनोद भुरले, पोहवा संजय आतकुलवार, नापोअ संतोष यलपुलवार, पो.अ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे ब.नं. यांनी यशस्वीपणे केली.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,