Home
Home Breaking News *नागभीड़ पोलिस स्टेशन हद्दित लैंगिक गुन्हयातील आरोपीस न्यायालय द्वारे २० वर्ष...

*नागभीड़ पोलिस स्टेशन हद्दित लैंगिक गुन्हयातील आरोपीस न्यायालय द्वारे २० वर्ष शिक्षा*

0
88

==========================

*नागभिड*

===========================

पोलीस स्टेशन नागभिड हद्दीतील मौजा कसरला परीसरात दिनांक ०७/०८/२०२० रोजी यातील पिडीतेला आरोपीतांनी संगणमत करून पळवून नेले व तिचे सोबत बळजबरीने लैंगीक अत्याचार केला. अशा फिर्यादीचे तकारीवरून आरोपी नागे १) अजय मुर्लीधर नन्नावरे वय २० वर्ष २) मंगेश दिवाकर मगरे वय २५ वर्ष यांचे विरूध्द दिनांक ०८/०८/२०२० रोजी अपराध कर्माक २२७/२०२० कलम ३६३,३७६ (१) (ए),३७६ (डी), ३०५ भादवी सहकलम ५ (ग), ६ लैंगीक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सपोनी पुनम पाटील यांनी केला असुन आरोपी विरुध्द सबळ साक्षपुरावा उपल्बध करून गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी विरुध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सदर खटला गा. कोर्ट विद्यमान श्रीमती ए.डी. देव मॅडम डी.जे.१ सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी विरुध्द खटला चालु असतांना सबळ साक्षपुरावे मिळून आल्याने आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी आरोपी १) अजय मुर्लीधर नन्नावरे चय २० वर्ष २) मंगेश दिवाकर मगरे वय २५ वर्ष यारा २०V वर्ष कारावास अशी शिक्षा देण्यात आली.

=========================

सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता देवेंद्र महाजन तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन सफौ. कुंदन वाघमारे ब.न.६८१ पोस्टे नागभिड यांनी मोलाची कामगीरी बजावली.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here