*लोकसभा उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) ने जाहीर केला पाठिंबा*

0
47

=======================

कोरपना(ता. प्र.):चंद्रपूर–वणी–आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्र,चे काँग्रेस चे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) ने इंडिया आघाडी, महाविकास आघाड़ी च्या कोरपना येथील घटे सेलिब्रेशन येथे पूर्व नियोजित पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकित 30/ 03/2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या जिल्हाध्यक्ष प्रियाताई खाडे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)
ने चंद्रपूर येथे आपले उमेदवार उभे केले नाही.प्रियाताई खाडे यांनी सांगितले की आमचा लढ़ा सुद्धा संविधान विरोधी पक्षासोबत असल्याने व देशात लोकशाही कायम राहावी या उदात्त हेतूने आम्ही काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली तसेच काँग्रेस चे जिल्हा महासचिव विजयराव बावणे यांच्या विनंतीला मान देऊन हा पाठिंबा जाहीर केला आहे.त्या पुढे म्हणाल्या की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) आमच्या पक्षाचे
राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा (समर्थन) देत आहे. व या लोकसभा निवडणुकीत प्रतिभाताई धानोरकर यांना विजय मिळवून देण्यास पूर्णपणे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रचार प्रसार पूर्ण ताकदीने करणार!
असे आवाहन देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष प्रियाताई खाडे यांनी केले आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here