=============================
*चंद्रपूर*
============================= पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम चालणार आहेत. त्यातीलच हा पहिला उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर. ============================= पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समारोह नागरी समिती, चंद्रपूर व इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्थानिक आय एम ए सभागृहात 2 जून ला रक्तदान शिबिर संपन्न झाले. ============================== या शिबिरात एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून जिल्ह्यातील रक्ताची गरज लक्षात घेता समितीच्या माध्यमातून अजून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रकल्प संचालक पवन ढवळे, प्रवीण उरकुडे, बंदिनी देरकर यांनी सांगीतले आहे. ============================== या शिबिरात आय एम ए चे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंत, प्रकल्प निर्देशक डॉ कल्पना गुलवाडे यांनी भेट दिली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समितीचे मार्गदर्शक तुषारजी देवपुजारी, समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव सुनील पोराटे, कोषाध्यक्ष निलेश काळे, वसंतराव थोटे, प्रवीण गिलबिले, जिल्हा सामान्य रुग्णालय रक्त संकलन केंद्राचे डॉ. आनंद आडे, पंकज पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,