गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ती संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

0
37

भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा उपक्रम लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

 

चंद्रपूर ब्युरो–
भारतीय जनता पार्टी (शहर व ग्रामीण)आध्यात्मिक समन्वय आघाडी, जिल्हा चंद्रपूर तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना भावांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने 12 जुलै रोजी सायंकाळी 6 ते 9.30 या वेळात स्थानिक प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह येथे एक शाम गुरुजनों के नाम’ या भक्ती संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाला आचार्य संत श्री मनीष महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, विदर्भ सह संयोजिका शिल्पाताई देशकर, डॉ. एस के. शुक्ला, राजकुमार पाठक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here