बाहेर धो धो पावसाच्या सरी, अंतरंगात आनंदाचे तरंग उरी ….! चंद्रपुर (का.प्र )

0
49
चंद्रपुरातील पहिली मराठी चित्रपट निर्मीती शहरातील दोन ध्येयवेड्या तरुणांनी गमतीने सुरू केली आणि अनेक जन जुडत गेले स्वप्न वास्तवात उतरले.सर्व आनंदाने बेभान झाले.
चंद्रपुरातील हे दोन युवक म्हणजे देवा बुरडकर व प्रितम खोब्रागडे  होय .’हद्द’ एक मर्यादा हा चित्रपट निर्मीती साठी अहोरात्र परिश्रम घेतले. हा एक सस्पेन्स थ्रीलर ‘ चित्रपट आहे. या चित्रपट निर्मितीचे वैशिष्ट्य हे कि, सर्व कलावंतानी मानधनाचीही अपेक्षा ठेवली नाही कारण एक दोन सोडले तर सर्व नवोदित होते. परंतू त्यांचा
अभिनय अप्रतिमच आहे.
सन २०१९ पासून चित्रपट निर्मीती सुरु झाली चित्रपटाचे नव्वद टक्के चित्रीकरण झाल्यावर चित्रपटाचा ट्रेलर तयार करण्यात आला. ट्रेलर लोकार्पण चा शानदार कार्यक्रम
सिध्दार्थ प्रिमीअर हॉटेलमध्ये तात्कालीन पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,आम.किशोर जोरगेवार,महापौर  सौ.राखीताई कंचर्लावार,राहुल पावडे,ब्रिजभुषण पाझारे
यांनी भरभरून आशिर्वाद व अभिनंदन प्रदान केले होते. ही गोष्ट २० जानेवारी २०२० ची.त्याच वर्षी मार्च नंतर प्रथमच कोरोना अर्थात कोविड १९ या आजाराने जागतिक विळखा घातला. अन् चित्रपट थंड बस्त्यात गेला.
दि. १०/७/२०22 स्थानिय डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृह चंद्रपूर येथे दुपारी 3 वाजता ‘हद्द’एक मर्यादा चित्रपटाचे आयोजन करण्यात आले या छोटेखानी कार्यक्रमात चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ व कलावंत प्रामुख्याने उपस्थित होते .ज्यामध्ये निर्माते देवा बुरडकर, प्रितम खोब्रागडे, प्रकाश परमार,के. राजू, अमित शास्त्रकार, मनिष आंबेकर, संजय रामटेके, प्रशांत कक्कड, प्रजेश घडसे, प्रकाश वाघमारे, शुभम भगत, मनोज तोकला ,शंकर दास, ज्योत्स्ना निमगडे, प्रदीप निमगडे, राजेंद्र वालदे, मृणाल कांबळे, रमेश तांडी, विजय भानसे, नरेश बुरडकर, आदि प्रामुख्याने उपस्थित होते.या आयोजनाचे प्रमुख कारण चित्रपटातील तांत्रिक व काही अल्प
त्रुटी चे निरसन करून ऑक्टोबर महिन्यात समस्त जनते समोर लोकार्पण होईल, असे एका पत्रकान्वये प्रसिद्धी प्रमुख
प्रकाश परमार यांनी कळविले आहे.
प्रति,
संपादक/वार्ताहर
उपरोक्त सामाजिक वृत आपल्या लोकप्रिय दैनिकात
प्रकाशित करून आम्हास  सहकार्य करावे विनंतीसह
धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here