मुल मध्‍ये पावसाचे थैमान, अनेक घरांमध्‍ये पाणी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे गरजूंना ताबडतोब मदत

0
101

सध्‍या सुरू असलेल्‍या अतिवृष्‍टीमुळे मुल शहरात अनेक घरांमध्‍ये अचानकपणे पाणी शिरले. यामुळे अन्‍नधान्‍य, वस्‍तुंचे प्रचंड नुकसान झाले. याचा आढावा घेण्‍यासाठी त‍हसिलदार श्री. होळी, नगर परिषदचे माजी उपाध्‍यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, अनिल साखरकर, मिलींद खोब्रागडे यांनी संपूर्ण शहराचा दौरा केला. त्‍यामध्‍ये अनेक घरांचे नुकसान झाल्‍याचे तहसिलदारांनी सांगीतले. यासर्व घरांचा पंचनामा करून त्‍यांना योग्‍य ते आर्थिक सहाय्य देण्‍यासाठी शासन तयार असल्‍याचे सुध्‍दा तहसिलदारांनी सांगीतले.

 

बल्‍लारपूर-मुल क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ही माहिती कळल्‍यावर त्‍यांनी आपल्‍या स्‍वीय सहाय्यकांना ताबडतोब मुलला पाठवुन या सर्व नागरिकांना लवकरात लवकर काय मदत करता येईल याचा आढावा घेण्‍यास सांगीतले. त्‍यानुसार आढावा घेतला असता असे लक्षात आले की अनेक घरांमध्‍ये पाणी गेल्‍यामुळे त्‍यांचे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे त्‍यातील अशा नागरिकांना पुढील काही दिवस पुरेल एवढे अन्‍नधान्‍य द्यावे असा प्रस्‍ताव आ. मुनगंटीवार यांना दिला असता तो त्‍यांनी ताबडतोब मान्‍य करून अशा अन्‍नधान्‍याच्‍या किट्स गरजूंना वाटप कराव्‍या असे सांगीतले. त्‍यानुसार तश्‍या किट्स तयार करून त्‍यांचे वाटप गरजूंना करण्‍यात आले. यासाठी नगर परिषदचे माजी उपाध्‍यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, अनिल साखरकर, मिलींद खोब्रागडे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here