चंद्रपूरकरांनो सावधान – इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

0
256

जिल्ह्यात संतधार सुरू असलेल्या पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत असून इरई धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहे. आसपासच्या इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, त्यांनी स्वत नदीच्या पात्रापासून दूर राहावे तसेच आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या दूर ठेवून इतरत्र ठेवावी नागरिकांना जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत असून इरई धरणाचे सातच्या सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. सततच्या पावसाने इरई धरणाच्या साठ्यात वाढ झाल्याने मंगळवारी पाच दरवाजे उघडण्यात आले होते माात्र आज बुधवारी धरणातील जलसाठा वाढल्याने सातही दरवाजे उघडण्याााात आले आहे. त्यामुळे वर्धा नदी पुलाच्या वरती २ फुट ओसंडून वाहत आहे. त्यामुळे आर्वी राजुरा मार्ग बंद झाला आहे. आणखी पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद केलं आहे. पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यात आपतग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची वेळ येणार त्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असून नदीकाठच्या नागरिकांवर आपप्ती जनक परिस्थिती नाही आली पहिजे म्हणून पूर्वतयारी करण्याचे आव्हान करीत आहे.

आपली गुरे नदीच्या पाण्यात जाणार नाहीत. तसेच नदीपात्रालगतची आपली शेती उपयोगी साहित्य, सामुग्री, पशुधन सुरक्षितस्थळी राहील याची दक्षता घ्यावी. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. कुठलीही आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात आल्यास त्वरीत प्रशासनास सूचित करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here