वे.को.लि. च्‍या ओव्‍हर बर्डनमुळे भटाळी गावात पाणी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सुचनेने उपाययोजना सुरु

0
54
चंद्रपूर तालुक्‍यातील भटाळी गावाच्‍या आसपास वे.को.लि. चे अनेक ओव्‍हर बर्डनचे डोंगर तयार झाले आहेत. उन्‍हाळयाच्‍या दिवसात या ओव्‍हर बर्डनमुळे धुळीचे लोट गावात येतात. ज्‍यामुळे गावक-यांना प्रचंड त्रास होतो. पावसाळयात यावर्षी अचानक आलेल्‍या मोठया पावसाने या ओव्‍हर बर्डनवरुन गावात मोठया प्रमाणात पाणी शिरले ज्‍यामुळे गावक-यांचे नुकसान झाले व त्‍यांच्‍या मनात भिती निर्माण झाली. ही सर्व घटना आ. सुधीर मुनगंटीवार यांना कळल्‍यावर त्‍यांनी ताबडतोब भाजपाचे पदाधिकारी व त्‍यांच्‍या स्विय सहाय्यकांना भटाळी पाठवुन उपाययोजना करण्‍यास सांगीतले.

त्‍यानुसार भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी त्‍याठिकाणी भेट देवुन वे.को.लि. अधिका-यांबरोबर संयुक्‍त दौरा केला. या ओव्‍हर बर्डनवर पडणा-या पाण्‍याला नाला करुन ते पाणी नदीकडे वळविण्‍यास वे.को.लि. ला सांगीतले. त्‍यानुसार वे.को.लि. ने रात्रीच काम करुन ते पाणी वळविण्‍यास सुरुवात केली. या दौ-यात माजी उपसरपंच सुभाष गौरकार, सरपंच राकेश गौरकार, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य, भटाळी गावातील नागरिक मोठया संख्‍येने उपस्थितीत होती.

यापुढे ओव्‍हर बर्डनचे पाणी गावात येणार नाही याकरीता स्‍थायी उपाययोजना करण्‍याचे निर्देश देवराव भोंगळे यांनी वे.को.लि. ला केले. यासर्व समस्‍येमध्‍ये आ. मुनगंटीवार यांनी त्‍वरित लक्ष घालुन उपाययोजना केली याकरीता भटाळी वासियांनी आ. मुनगंटीवार यांना धन्‍यवाद दिले आहेत.

संपादक शशि ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here