गुरुचा सन्मान ही भारताची परंपरा…संत मनिष महाराज

0
50
भक्तीसंगीतात तल्लीन झाले चंद्रपूरकर
भाजपा आध्यात्मिक आघाडीचा उपक्रम
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या शुभेच्छा

चंद्रपूर ब्युरो- मनुष्य हा आजीवन विद्यार्थी आहे.ज्यांच्याकडून काही ज्ञान प्राप्त होते.असे सर्व गुरू समान आहेत.आई-वडील हे प्रथम गुरू आहेत.गुरूचा सन्मान करणे ही भारताची परंपरा आहे.असे प्रतिपादन संत मनीष महाराज यांनी केले. ते भारतीय जनता पार्टी (शहर व ग्रामीण)आध्यात्मिक समन्वय आघाडी, जिल्हा चंद्रपूर तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना भावांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने आयोजित 12 जुलैला प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह येथे एक शाम गुरुजनों के नाम’ या भक्ती संगीतमय कार्यक्रमात बोलत होते.या वेळी विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा शुभेच्छा व्हीडिओ संदेश प्रसारित करण्यात आला.यावेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर,जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,देवराव भोंगळे,भाजपा महासचिव सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,माजी उपमहापौर राहुल पावडे,आध्यात्मिक आघाडीचे शिल्पाताई देशकर,शैलेंद्र शुक्ला,राजकुमार पाठक भाजपा नेते शिला चव्हाण,माया उइके
संदीप आगलावे,सचिन कोतपल्लीवार,दिनकर सोमलकर,विठ्ठल डुकरे,रवी लोणकर,
डॉ किरण देशपांडे,सूर्यकांत कुचनवार,विनोद शेरकी
धनराज कोवे,धम्मप्रकाश भस्मे,रुद्रनारायण तिवारी,रामकुमार आकेपेल्लीवार,राकेश बोमनवार,प्रवीण उरकुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी गुरूच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित जनसमुदयाने
प्रजापिता ब्रम्ह कुमारी,गोंदवलेकर महाराज स्वामी समर्थ,संत गोरा कुंभार,संत रविदास, सत्य साईं बाबा,मीरा बाई,श्री श्री रवि शंकर, निर्मला माता, साईं बाबा,स्वामी गजानन,भगवान बुद्धा,संत तुकडोजी महाराज
,गुरु नानक,ठाकर सिंहजी महाराज,संत कबीर,गुरु हरी चाँद,ठाकुर,गुरुदेव दत्त यांची स्तुती करणाऱ्या भावगीतांचा आनंद घेतला.राजू गोयल,निभा सरकार,मंगेश देऊरकर,संजय नासिरकर,देवदत्त सातपुते,प्रणाली पांडे,स्वरूपा जोशी,श्याम झाडे,रोशनी वासमवार,विकास दुपारे,उर्वशी भूमकर,हिमांशू रंगारी, रिद्धी राऊत,निखिल शर्मा,रामानंद करूष,रश्मी हिवरे,राज ताटपल्लीवार,निभा सरकार,उर्वशी भूमकर,निकिता चंदनखेडे,अपर्णा घरोटे,जय काच्छेला यांनी भक्तीगीते सादर केली.

संपादक शशि ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here