आताची सर्वात मोठी बातमी! राज्यातल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती

0
36

मुंबई – आताची सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वी नगर परिषदांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा केली आहे. खरं तर या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी करण्यात आली होती. कारण या निवडणूक पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या. या मागणीचा विचार करता निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
पण सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या निवडणुका 18 आणि 19 ऑगस्टला नियोजित होत्या. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार होतं. तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार होती. पण या निवडणुकीवरुन ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर प्रश्न उपस्थित केले जात होते.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय या निवडणुका होवू नये, अशी मागणी केली जात होती. दुसरीकडे पावसाचा मुद्दा उपस्थित करत काही राजकीय पक्षांनी या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन 12 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला आहे.

संपादक शशि ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here