वर्धा नदी तिन दिवसांत दुसऱ्यांदा फुगली
सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कित्येक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन राजुरा तालुक्यात बऱ्याच गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती असुन खुद्द तालुका मुख्यालय मागील आठवड्यात जवळपास चार दिवस जिल्हा मुख्यालया पासून रस्ता मार्गे संपर्क कक्षेच्या बाहेर होता.
रविवारी चार दिवसांपासून असलेला वर्धा नदीला आलेल्या पूर ओसरल्याने राजुरा येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला होता मात्र पुन्हा तिसऱ्याच दिवशी शहराचा संपर्क पुरामुळे खंडित झाला आहे.
काल दिनांक 18 जुुलै पासुन इरई धरणाचे सातहीदरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीच्या पात्रातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली. तिकडे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक सर्वच नद्या फुगल्या असल्याने पाण्याचा विसर्ग त्या भागातही होऊ शकला नाही त्यामुळे राजुरा तालुक्यातील कोलगाव, चार्ली, सास्ती ह्यासह नदीकाठच्या इतर गावाांना पुराचा विळखा पडला असुन बामणी राजुरा दरम्यान असलेल्या वर्धा नदीच्या मोठ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तो मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला असून शहराला पुन्हा एकदा पुराचा सामना करावा लागत आहे. यासोबतच राजुरा धोपटाळा दरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर पाणी येण्याची चिन्हे असुन लवकरच तो मार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता असून असे झाल्यास तालुका मुख्यालय पुन्हा एकदा रस्ते मार्गे संपर्क क्षेत्राच्या बाहेर होण्याची चिन्हे आहेत.