चिमूर क्रांती भूमीतील शुभम झळकणार मराठी चित्रपटात

0
78

चंद्रपूर : जिद्द , आत्मविश्वास आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थीवर मात मरता येतो . मग तो क्षेत्र राजकारण , समाजकारण किंवा फिल्मी दुनियेचे असो . अशाच एका गुणी तरूणाची कामगिरी चंद्रपूर जिल्हयातील चिमूर क्रांतीभूमिसाठी गौरवाची ठरणार आहे . परिस्थिती अत्यंत गरीबीची , वृत्तपत्र विकून शिक्षण पूर्ण केले .. पुढे शहरासारख्या ठिकाणी नवीन काहीतरी करण्याच्या शोधात गेला . मात्र एका भल्या माणसाला त्याच्यातील कलेचे गुण ओळखता आले . त्याला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी देण्यात आली . त्याने संधीचे सोने करण्यासाठी पटकन होकार दिला आणि आता एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय . त्यामध्ये चिमूर येथील शुभम भगत नावाचा तरूण झळकणार आहे .
राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने चिमूर क्रांतीभूमी पावन झाली आहे . त्यांच्या विचारांची क्रांतीभूमी ख्याती प्राप्त झालेल्या या भूमिला संत आणि सांस्कृतिक भूमीचा वारसा लाभला आहे . या क्रांतीभूमितून शुभम भगत लवकरच एका मराठी चित्रपटातून झळकणार आहे . शुभमने चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेल्या पहिल्या मराठी चित्रपटात काम केले आहे . हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे . त्याच्या कलाकौशला या मधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे .
चिमूर शहरातील आझाद वार्ड निवासी शुभम भगतचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला . परिस्थीत अत्यंत गरीबीची असल्याने त्याने वृत्तपत्रे कमाई मिळणाऱ्या कमाईतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले . गरीब कुटुंबात जन्मलेल्या शुभमला नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा ध्यास होता . परंतु गरीबी आड येत होती . तसेही चिमूरमध्ये रोजगाराची वाणवा आहे . कितीही शिक्षण घेतले तरी रोजगारासाठी शहराबाहेर पडावेच लागते . मग शुभमची कशी शहरात रोजगाराची गरज पूर्ण होणार . अखेर शुभमला चंद्रपूरला जावे लागले . त्या ठिकाणी जावून त्याने आपल्या आर्थिकस्थितीची जुळवाजुळव केली . त्याच कमाईतून आपल्या कुटुंबाला तो मदतीचा हात देत राहिला . त्याच्या परिवारात आई शोभाबाई , लहान बहिण शमा आणि शुभम असा त्याचा परिवार आहे . वडिलांच निधन झाले आहे . वडिलांचा पूर्वी केसकर्तनालयाचा व्यवसायाचा होता . परंतु वृध्दापकाळाने त्यांनी काम बंद केल्याने शुभम चिमूरात एका डॉक्टराकडे काम करीत होता . त्याच ठिकाणी आई काम करू लागली . यातून त्याला वैद्यकीय व्यवसायाबद्दल माहिती झाली . त्यानंतर चंद्रपूरात जावून छोटासा व्यावसाय थाटला . कणकणात अभिनयाचीकला असल्याने तो नेहमीच संधी शोधत राहीला आणि त्याला एक दिवस यश आले .
अशातच चंद्रपूरमध्ये शुभमची ओळख मराठी चित्रपटाचे निर्माते देवा बुरडकर यांच्याशी झाली . शुभममधील अभिनयगुणाची झलक त्यांना पहायला मिळाली . त्यामुळे त्यांनी शुभमला चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच तयार होणारऱ्या मराठी चित्रपटाबद्दल माहिती दिली . आणि चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा केली . नेहमीच नवीन संधीच्या शोधात असलेल्या शुभमला संधीचे सोने करायचे असल्याने त्याने पटकन होकार दिला . ‘ हद एक मर्यादा असे चित्रपटाचे नाव असून त्याने या मध्ये उत्तम अभिनय केल्याचे दिसून येत आहे . या मराठी चित्रपटाचा पहिला शो देखील चंद्रपुरात ठेवण्यात आला होता , तुफान पावसातही या चित्रपटाचा प्रीमियर पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती . गरीबीत जन्मलेल्या शुभमच्या अभिनयाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले आहे . देवा बुरडकर आणि प्रीतम खोब्रागडे निर्मित ‘ हद एक मर्यादा ‘ हा चित्रपट एक सस्पेन्स ट्रिलर आहे . चित्रपटाची निर्मिती 2019 मध्ये सुरू झाली , आणि 90 टक्के चित्रपट तयार झाल्यानंतर , चित्रपटाचा ट्रेलर तयार झाला आणि प्रदर्शित झाला . कोरोना संसर्गामुळे , चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होवू शकले नाही . मात्र कोरोनाचे सावट टळल्यानंर शुटींग पूर्ण करण्यात आली . आता लवकरच ऑक्टोबर मध्ये हा चित्रपट प्रदर्शीत होत आहे . यामध्ये क्रांतीभूमितील शुभमच्या अभिनयाची क्रांती पहायला मिळणार आहे . त्याच्या अभिनयाने क्रांती भूमिचीचर्चा सर्वत्र होतआहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here