7 दिवसांत खड्डे बुजवा,अन्यथा आंदोलन भाजपा मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे यांचा इशारा बाबुपेठ

0
61
बाबुपेठ मंडळातील बागला चौक ते राजीव गांधी व अभियांत्रिकी महाविद्यालय ते रेल्वे ओव्हर ब्रिज पर्यतचा रस्ता,बागला चौक ते चांदा फोर्ट रेल्वे गेट पर्यत रस्ता,मराठा चौक ते जुनोना बायपास चौक रस्ता या प्रमुख रस्त्यांवर संततधार पावसामुळे मोठं मोठे खड्डे तयार झाले.याचा प्रचंड त्रास विद्यार्थ्यांना व नागरिकांना सहन करावा लागत आहे.हे खड्डे येत्या 7 दिवसात बुजवावे अन्यथा महानगर भाजपा  दक्षिण मंडळ तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यावेळी दशरथ सोनकुसरे, आकाश ठुसे, राजेंद्र दागमवार, डॉ प्रमोद रामटेके,मुकेश गाडगे, कुणाल गुंडावार, हिमांशू गादेवार, राजेश यादव, आकाश लक्काकुलवार, विवेक शेंडे, काळे,दुमदेव मरसकोल्हे,सागर भगत यांची उपस्थिती होती.
यावेळी संदीप आगलावे म्हणाले,बाबूपेठ येथे किमान 40 हजार लोकांची वस्ती आहे.दररोज हजारो विद्यार्थी व इतरांना शहरात जावे लागते.परंतु सद्या रस्त्यांची हालत खस्ता झाली आहे.यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.अश्यास्थितीत खड्डे बुजविणे व नंतर कायम दुरुस्ती करणे हाच पर्याय आहे.मनपा प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे,अशी मागणी त्यांनी केली.
आ.मुनगंटीवार यांनाही निवेदन

भाजपा दक्षिण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भातील निवेदन लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांना सादर केल्यावर त्यांनी लगेच दखल घेत आयुक्तांना सूचना करीत कारवाईचे आदेश दिले.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here