भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे माजी अर्थमंत्री,विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे(30 जुलै)औचित्य साधून महानगरातील 5 मंडळात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात रक्तदान करून लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रति असलेल्या प्रेमाला कृतीची जोड द्यावी असे आवाहन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,ज्येष्ठ नेते प्रमोद कडू,महासचिव सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,माजी महापौर राखी कंचर्लावार,माजी उपमहापौर राहुल पावडे,माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी केले आहे.
महानगरातील पूर्व,पश्चिम,उत्तर ,दक्षिण व मध्य मंडळात हे शिबीर आयोजित असून हनुमान मंदिर इंदिरा नगर,डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जटपूरा गेट,मातोश्री विद्यालय तुकुम,संत रविदास सभागृह बाबूपेठ व गिरनार चौक येथे हे शिबीर स.10 ते दु 3 वाजता दरम्यान संपन्न होणार आहे.शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,मंडळ प्रमुख रवी लोणकर,विठ्ठलराव डुकरे,सचिन कोतपल्लीवर,दिनकर सोमलकर,भारती दुधानी,संदीप आगलावे,छबु वैरागडे व इतर परिश्रम घेत आहेत.
चला रक्तदान करू, समाजाचे ऋण फेडू…असे घोषवाक्य या शिबिराकरिता देण्यात आले आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793