स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वातंत्र दिनी विविध ठिकाणी होणार ध्वजारोहण

0
51

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वातंत्र दिनी म्हणजेच सोमवारी १५ ऑगस्टला शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमाला नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
    यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अंतर्गत प्रत्येक घरी तिरंगा हा उपक्रमही संपुर्ण देशात राबविण्यात येत आहे. आठवडाभरापुर्वीपासुनच चंद्रपूरातही विविध कार्यक्रम घेतल्या जात आहे. यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनीही मतदार संघातील चंद्रपूर येथे १०० तर  घुग्घुस येथे ७५ फूट उंचीचा तिरंगाध्वज उभारण्यासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळता केला आहे.
दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शहरातील प्रत्येक वार्डात १५ ऑगस्टला  राष्ट्रध्वज फडकविण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. त्यानुसार सदर कार्यक्रमाची तयारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात आली असुन स्वातंत्रदिनी चंद्रपूर शहरातील प्रत्येक वार्डात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थांना नोटबुक चे हि वितरण करण्यात येणार आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here