वैनगंगा नदीने केले रौद्ररूप धारण ब्रह्मपुरी तालुक्याला महापुरांचा फटका

0
74

हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली ; गोसे धरणांमधून पाणी सोडल्याने

 

ब्रह्मपुरीः गेल्या महिन्याभरापासून सततधार होणाऱ्या अतिवृष्टी व पावसामुळे ब्रह्मपुरी परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या आठवड्याभरात आलेल्या पुरात हजारो हेक्टर शेत जमीन पुराच्या पाण्याखाली आल्याने बाधित झाली आहे शिवाय दुसऱ्यांदा पुन्हा शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे 15 आगस्ट व 16 ऑगस्ट रोजी आलेल्या पुरात हजारो हेक्टर शेत जमीन आजही पाण्याखाली आहे तातडीने ब्रह्मपुरी तालुक्यातील रनमोचन खरकाळा पिंपळगाव चिखलगाव पारडगाव सौद्री सुरबोडी चिखलगाव लाडज बेटाळा किन्ही अर्हेर नवरगाव बेलपातळी मांगली जुगनाळा रूई निलज पाचगाव बेलगाव कोल्हारी देऊळगाव हरदोली पारडगाव भालेश्वर पिंपळगाव भोसले डोरली बरडकिन्ही चिचगाव • गांगलवाडी तसेच ज्या ज्या गावांना पुराचा फटका बसला आहे अशा इतर गावातील शेतीचे पंचनामे व सर्वेक्षण करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे
ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्ग बंदः भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक रस्ते बंद झाले असून ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदी वर बांधण्यात आलेल्या पुलावरून वृत्तलीहस्तो पर्यंत जवळपास एक फुटापर्यंत पाणी फुलावरून वाहत आहे स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाने दिलेल्या सूचनेनुसार कोणत्याही नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असतांना ये जा करू नये शिवाय नदी काठा लगत असलेल्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत स्थानिक प्रशासनाकडून नदीकाठा लगतील गावांना भेटी : तालुक्यातील नदीकाठा लगेच बऱ्याच गावांना स्थानिक प्रशासनाने भेटी देऊन सोयीनुसार आपापले साहित्य बांधून तयारीत राहावे पुराचे पाणी गावात शिरतात अथवा मार्ग बंद होत असताना तुमच्याकडे असलेल्या साधनांनी विशिष्ट नेमून दिलेल्या ठिकाणी तुमची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here