अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजु

0
29

आ. जोरगेवार यांच्या मागणीला यशग्रामीण भागाला शहराशी जोडणारे रस्ते होणार चकाचक

चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागाला शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम आणि छोट्या पुलांसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सदर मागणी मान्य करण्यात आली असुन सदर कामांसाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीक विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांसाठी त्यांनी नुकताच 20 कोटी रुपयांचा निधी खेचुन आनला आहे. तर ग्रामिण भागाच्या विकासासाठीही त्यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागाला शहराशी जोडणा-या रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली होती. त्यामुळे याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता या मार्गाच्या दुरस्तीसाठी तसेच सदर मार्गावरील छोट्या पुलांच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पीय २०२२ – २३  पुरवणी यादीत ६० कोटी रुपयांची तरतुद करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. आज पावसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसी सदर मागणी मान्य करत या कामांसाठी ६०  कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे.

या निधीतून चंद्रपूरातील आरवट होत पठाणपुरा – माना – विसापूरहुन नांदगावला जोडणा-या  मार्गाचे सिंमेट काॅंक्रिटीकरण करण्यासाठी २१ कोटी रुपये, साखरवाही – येरुर – वांढरी – एमआयडीसी – दाताळा – चंद्रपूर या मार्गासाठी ११ कोटी रुपये, शेणगांव – उसेगांव – वढा – धानोरा – पिपरी मार्डी रस्त्यावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी रुपये, ताडाळी – येरुर – पांढरकवडा – धानोरा – भोयेगाव – गडचांदुर जिवती मार्गावर सिमेंट नाली आणि गट्टु लावण्यासाठी १ कोटी रुपये, शेणगाव – उसेगाव – धानोरा – पिपरी – मार्डा – शिवनी एमडीआर १२ या मार्गासाठी १ काटी ८० लाख, रुपये खर्च करण्यात येणार असुन यासह ग्रामीण भागातुन शहराला जोडणा-या इतर महत्वांच्या रस्त्यांचे बांधकामही या निधीतुन मंजूर करण्यात आले आहे. यात रस्त्यावरील छोट्या पुलांचे नालीचे व सौदर्यीकरणाची कामेही पुर्ण करण्यात येणार आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here