*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793
दिनांक १५ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या ७५ दिवसांच्या कालावधीमध्ये कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सवानिमीत्त सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना त्यांचा प्रिकॉशन डोस मोफत देण्याच्या प्रक्रियेत ही मोहीम राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्हयाला अतिरिक्त लसटोचक यांची आवश्यकता असल्याने एकूण रू. रू.५७,७५,०००/- निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा राज्य कुटूंब कल्याण यांना कळविले होते. वन व सांस्कृतीक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा करून सदर निधी मंजूर करविला आहे. त्यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयात कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सवाअंतर्गत १८ वर्षावरील पात्र नागरिकांना त्यांचा प्रिकॉशन डोस आता मोफत उपलब्ध होणार आहे.