… चंद्रपूर : ··· अन् वाघांची जोडगोळी आली रस्त्यावर ; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

0
50

ताडोबालगतच्या वीज केंद्र परिसरात व्याघ्र जोडीचे झाले दर्शन

ताडोबा जंगलाला लागून असलेल्या वीज केंद्र परिसरात वाघाच्या जोडगोळीने पुन्हा एकदा दर्शन दिले . ऊर्जानगर , दुर्गापूर व वीज केंद्र परिसरात वाघ व बिबट्याने आतापर्यंत दोन बालकांसह पाच जणांचा बळी घेतला आहे . त्यात आता ही व्याघ्र जोडी दिसल्याने परिसरात पुन्हा एकदा भीती व दहशतीचे वातावरण आहे . ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल तथा परिसरात वाघ व बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . ताडोबा प्रकल्पाचा रस्ता तथा वीज केंद्र , ऊर्जानगर , दुर्गापूर , इरई धरण , पद्मापूर , भटाली परिसरात सातत्याने वाघाचे दर्शन होते .

वनविभाग झाला सतर्क –
शनिवारी रात्री या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा एकदा वाघाचे दर्शन झाले . वीज केंद्र ते ताडोबा मार्गाला जोडणाऱ्या या भागात वाघाची जोडी आढळली . वर्दळीच्या मार्गावर वाघाच्या जोडीने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे . याच भागातून आसपासची गावे व कोळसा खाणीच्या प्रकल्पांकडे जाण्याचा आहे मार्ग . यामुळे वनविभाग सतर्क झाला असून अधिकारी व्याघ्र जोडीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here