वरोऱ्यात 10 जुगार बहाद्दरांना अटक

0
37

वरोरा – 22 ऑगस्टला वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात अर्जुन ट्रेडर्स येथे धाड मारली असता त्याठिकाणी 10 जुगार बहाद्दरांना अटक करीत या कारवाईत एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
22 ऑगस्टला पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांना गोपनीय माहिती मिळाली की बोर्डा येथे काही इसम जुगारावर पैसे लावत आहे .गोपनीय माहितीच्या आधारे नोपाणी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत बोर्डा येथील अर्जुन ट्रेडर्स वर धाड मारली . त्यावेळी 10 जुगार बहाद्दर हे 52 पत्त्याचा जुगार खेळत पैसे लावत असल्याचे निदर्शनास आले . जुगार खेळणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एकूण 59 हजार 830 रुपये जप्त करण्यात आले . पोलिसांनी जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 , 5 अंतर्गत कारवाई करीत गुन्हा नोंद केला . यामध्ये दीपक उर्फ पप्पू सांबाशिव महाजन , सुभाष नथुजी आसुटकर , प्रकाश शामराव खोब्रागडे , हेमंत शिवसिंग राजपूत , डेव्हिड शंकर बागेसर , मारोती सहुजी गायकवाड , विशाल अशोक आसुटकर , प्रकाश सत्यवान ताजने , प्रकाश नारायण आवारी व चेतन रामराव घुगुल यांना ताब्यात घेण्यात आले . सदर सर्व आरोपींचे चारचाकी व दुचाकी वाहन पकडून एकूण 10 लाख 24 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
विशेष म्हणजे सदर आरोपी मधून काही राजकीय पक्षाशी संलग्नित आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here