मुस्लीम विकास मंच बहुउद्देशिय संस्थेतर्फे येथील बिनबा गेट परिसरातील मस्जीद जवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात 50 ते 60 रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हाजी हारून, सामाजिक कार्यकर्ते , असलम मुफ्ती, इरफान शेख, अॅड. रफीक, अयुब खान, साहारा स्वनेस्ता, शरीब खान, सीरीन कुरेसी, शाईन बानो शेख, मुन्नी बाजी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख म्हणाले, समाजात रक्ताची नितांत गरज भासते. रुग्णाला रक्त वेळेवर हवे असल्यास त्यांच्या नातेवाईकांची, आप्तजणांची मोठी फरफट होते. अलिकडे सरकारी रुग्णालयात देखील रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे रक्ताअभावी कुणाचाही मृत्यू होऊ नये, हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला. यापुढेही असे समाजहिताचे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून यासाठी तरुणाईने पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला या परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी खवातीने इस्लाम, सहारा सामाजिक महिला बहुउद्देशिय संस्था, मा. फातेमा महिला संस्था, हुदा मस्जीद कमेटी चंद्रपूर आदींचे सहकार्य लाभले.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793