चंद्रपूर : विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. परंतु, शिक्षकांवर शिकवण्यापेक्षा इतर कामाचे ओझे त्यांच्या त्यांच्यावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. येत्या काळात इतर कामांकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी करणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.
आज वरोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती तर्फे खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनराज रेवतकर, गणपत विधाते, गणेश बोढे, विजय परचाके, संदीप चौधरी, अशोक टिपले, विजय सातपुते, चंद्रधर साठे, सुनील नगराळे, पवन शर्मा, योगीराज डाखले, रामचंद्र सालेकर, संजय आगलावे, विकास घागी, सतीश डोंगरे, राजेंद्र पांडे आदी शिक्षकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शिक्षक आपल्या मागण्या मांडताना म्हणाले कि, यापुढे शिक्षकांवर सोपविलेली सर्व अशैक्षणिक कामे काढून घेवून ही कामे इतर कुणाकडूनही करुन घ्यावीत, शिक्षकांना पूर्णवेळ विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी देता यावा, यासाठी व्यवस्था करावी. विद्यार्थी व त्याचं भविष्य महत्वाचेआहे. शिक्षकांना नको त्या अशैक्षणिक कामातून मुक्त करुन या शिक्षकांना जास्तीत जास्त वेळ अध्यापन करता वापरता यावा, उपक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अध्ययनापासून ठेवण्यात येत आहे. हि बाब भविष्यात शिक्षण व्यवस्थेसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.
यावेळी वरोरा तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एका कृती समिती द्वारे एकाच व्यासपीठावर येऊन आमदार बंब यांच्या शिक्षकांसंदर्भातील बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध यावेळी शिक्षकांनी केला.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793